फॉलोअर

सोमवार, २५ मे, २००९

दोघांच्या वादात नुकसान मराठीचे!!

गेले २ दिवस व्रुत्तापत्रान्तुंन गाजले ते मनसेचे सर्वेसर्वा माननीय राजसाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातील शब्दांचे वार राज साहेबांची फटकेबाजी सर्वानीच लाइव पाहिली आणि त्यांच्या सदेतोड़ मुद्द्याना त्यांच्या कार्यकर्त्यानी मस्त दाद दिलेलिही आपण पहिली थेट उद्धवना उद्देशून विचारलेला प्रश्नही "सॉलिड" होता!! शिवसेनेने उपस्थित केलेले सर्व मुद्दे त्यानी खोडून काढले आणि महाराष्ट्राचा पुढचा मुख्यामंत्रिही मीच ठरवणार असेही जाहीर केले. थेट आरोपामुले वैतागलेल्या उद्धव यानीही जोरदार टीकास्त्र सोडले. आता तर हां वाद केव्हाही रस्त्यावर उतरण्याची शक्यता निर्माण जालेली आहे दोघांचा हा वाद तसा ऐकायला फार चांगला वाटत असला तरीही त्याचे दूरगामी परिणाम चांगले असणार नाहीत हे निश्चित आहे त्यामधे इतर कुणाचे नाही तर नुकसान आहे ते मराठी मान्साचेच!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा